वंचित मिशन न्युज: शनिवार रोजी महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर येथील राजोरा विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने आयोजित सभेला संबोधित करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीपकभाऊ निकाळजे यांनी सर्व आरपीआय (आंबेडकर) नेत्यांनी विधानसभेची तयारी करावी असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. महाराष्ट्र आगा ऑफ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, राज्यातील 180 जागांसाठी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील म्हणाले की, पक्ष देशाच्या सर्व राज्यांत आपले उमेदवार उभे करतो. सत्तेत सहभागी होण्यासाठी तुमचे आमदार जिंकावे लागतील.
प्रियाताई चंद्रपूरच्या राजोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजक प्रियाताई खाडे, कुवरलाल रामटेके, तानाजी मिसले, दुर्वास चौधरी, संतोष इंगळे, विकी वानखेडे, विवेक खाडे यांनी संबोधित केले. संचालन ज्ञानेश्वर नागराळेयांनी केले. बाबासाहेबांच्या बैठकीनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीतांचा कार्यक्रम झाला. गायिका संविधान मनोरेआणि गायिका निशाताई धोंगडेयांनी सादरीकरण केले.यावेळी पार्टी चंद्रपूर जिल्हा व महारष्ट्र प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .