अनिल मुन यांची रिपाइं (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार हिंगणघाट तालुका विधानसभा प्रभारी पदी निवड 

Spread the love

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : आंबेडकरी चळवळीत ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक,व राजकीय भूमिकेतुन आजपर्यंत सहभाग घेतला ते हिंगणघाट येथील भीम सैनिक अनिल मुन यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या हिंगणघाट तालुका विधानसभा प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनात विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी अनिल मुन यांना हिंगणघाट तालुका विधानसभा क्षेत्राच्या प्रभारी पदी नियुक्ती देऊन त्यांच्याकडे हिंगणघाट तालुका विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रचार यंत्रणेची जबाबदारी सोपवली आहे.

 

रिपाइं (आंबेडकर) च्या हिंगणघाट तालुका विधानसभा प्रभारी पदी अनिल मुन यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे पक्षाचे वर्धा जिल्हा महासचिव सुधिर साहारे,जिल्हा संघटक समाधान पाटील,जिल्हा सचिव सुभाष कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद थूल,अरविंद भगत,वर्धा विधानसभा अध्यक्ष रुपेश नागदिवे,देवळी तालुका अध्यक्ष बालकृष्णा भस्मे, आर्वी तालुका विधानसभा अध्यक्ष प्रविण कांबळे तसेच आंबेडकरी कार्यकर्ते मनोज वासेकर,सुभाष सोयाम,मयूर सुखदेवे,प्रशांत निमसरकार, नंदू वाघमारे,विनोद गोडघाटे, विवेक भगत,शंकर निमसरकार आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *