बेदली , फसवणूक , विश्वासघात, उन्माद , अहंकार, असे माज व ऊत , आलेलं भाजप ,शिवसेना (शिंदे गट), महायुती सरकार – नितिन बांडगुळे पाटील

Spread the love

वंचित मिशन न्युज मुंबई : -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र तडीस नेऊन ठेवला आहे. नैतिक मूल्य ,ध्येयधोरणे, विचार ,तत्त्व सर्व वाऱ्यावर उडून गेली ,सत्ता आणि मत्ता एवढेच भाजप शिवसेना ( शिंदे गट) यांचे अंतिम ध्येय आहे. राज्यव्यवस्था चालवायचे असेल तर पायाखाली नैतिक मूल्य असावे लागते राज्यव्यवस्थेच्या पायाशी सत्य, न्याय, विश्वास ,आणि शिव हे नैतिक मूल्य असावे लागते हे जर नैतिक मूल्य नसतील तर व्यवस्था ,ती व्यवस्था न राहता तो जंगलाचा कायदा होतो आणि तिथे नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात असे बानगुडे पाटील यांनी म्हटले आहे .
सत्तेच्या सामर्थ्याने गोरगरीब जनतेचे कान पुढे जात आहे विकास कुठे आहे खाली योजना घोषित करणे व जाती-जातीच राजकारण करणे हेच महायुती सरकारच धोरण आहे असे म्हणाले . योजना जाहीर करणे आणि नुसती भूमिपूजन केले म्हणून विकास नव्हे लाडके बहीण योजनेचे 1500( पंधराशे ) रुपये बँक खात्यात जमा केले पण जगणं महाग करून टाकणारी महागाई महायुती सरकार अपयशी ठरले आहे असे उदगार त्यांनी केले .
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीण योजनेचे जाहिरात चालू आहे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे हा जाहिरात बाजीचा जर खर्च वाचवला असता तर महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देता आले असते . पण महायुती सरकारचा भर देण्यावर नसून देखाव्यावर आहे असे बानगुडे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात किसान सन्मान निधीचे 6000 खात्यात येतात खरे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या.आत्महत्या कमी झाल्याच नाहीत मागील तीन महिन्यात 517 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु या माहिती सरकारला त्यांचे काहीही सोयर सुतक नाही केंद्र सरकारने एक रुपया पीक विम्याचे ढोल वाजवले खरे पण पिक विम्याची एकही रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ते पुढे म्हणाले एका शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे अर्ज केला की मला पीक विम्याचे पैसे बँक खात्यातून काढण्यासाठी मला पोलीस संरक्षण द्या असे म्हटले त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी विचारले कशासाठी कुठून पैसे आलेत तर त्यांनी उत्तर दिले की पिक विम्याचे 27 रुपये बँक खात्यामध्ये आलेले आहेत त्यासाठी मला संरक्षण पाहिजे म्हणून या भाजप ,महायुती सरकारला कोणाचेही काही देणे घेणे नाही आहे महाराष्ट्रात तरुणाची काय हाल चालू आहेत . 42 टक्के तरुण बेरोजगार आहेत . मागे काही दिवसांपूर्वी पोलीस भरती निघाली जागा सहा हजार अर्ज आले किती सात लाख तीन विभागाच्या भरती निघाल्या जागा 23000 अर्ज आले 35 लाख बेरोजगार विद्यार्थी यांचे मुख्य कारण महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात स्थलांतरित केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील उद्योग कंपनी बाहेर गेलेली नाही परंतु महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या काळात दिवसाला एक उद्योग कंपनी महाराष्ट्र बाहेर जात आहे असे बानगुडे पाटील म्हणाले

महाराष्ट्रातील महायुती सरकार गुजरात चालवते का असं सवाल बानगुडे पाटील यांनी सवाल केला. आज महाराष्ट्रावरती सात लाख 82 हजार कोटी कर्ज आहे 56हजार कोटी व्याज भरावा लागतो . महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर 62 हजार रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे महायुती सरकारने जाती-जातीत भांडण लावली. शिंदे महायुती सरकार हे मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार होते या आरक्षणाचे काय झाले ओबीसीच्या धनगर आरक्षणाचे , आदिवासी प्रश्नांचे, युगप्रवर्तक शिवाजी महाराज यांचा पुतळा रायगड येथील राजकोट येथे कोसळला तो पुतळा कोसळा नव्हे तर माहिती सरकारने धर्म कोसळला , पुतळा कोसळला नव्हे त्याची अस्मिता कोसळली, पुतळा कोसळला नव्हे त्याची नैतिक मूल्य ढासळली, साडेतीनशे वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती किल्ले उभारले पण त्या किल्ल्यांना लाटाचे तडाके खाऊन हे दगड झिजली पण दोन दगडातील चिरा मात्र तसाच मजबूत राहिला ,असे सवाल शिंदे महायुती सरकारला या शिवतीर्थ दसरा मेळाव्यात नितीन बानगुडे पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *