जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनाकडे डोळे झाक करण्यासाठी राज्यभरात आव्हाड यांच्या विरुध्द भाजपचे आंदोलन

Spread the love

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनाकडे डोळे झाक करण्यासाठी राज्यभरात आव्हाड यांच्या विरुध्द भाजपचे आंदोलन

रायगड जिल्हा : (प्रतिनिधी- साहिल कांबळे)जितेंद्र आव्हाड यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोकांचा समावेश केल्या प्रकरणी भाजपा, शिवसेना ,सरकार यांच्याविरोधात महाड येथे आंदोलन केले होते .ते प्रकरणाला डोळे झाक करण्यासाठी भाजप राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द आंदोलन सुरु…..

185 किलोमीटरचा प्रवास करून माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी फटकारत
महाड येथील राजकीय वातावरणावर जाहीर माफी मागूनही त्यांच्या विरुध्द आंदोलन सुरू आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोकांचा समावेश केलेला विषय बाजूला ठेवत भाजपला आयता मुद्दा मिळाला आणि फडणवीस यांच्या निर्देशानुसार पोलिस अधिकारी यांनी गुन्हा पण दाखल केला आहे. याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागितल्यानंतर विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.प्रकारानंतर राज्यभरात संताप उसळला.

ठिकठिकाणी आंदोलने झाली. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रोष व्यक्त झाला. महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरु लागली. झालेल्या प्रकाराबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली. पण राजकीय आंदोलन चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात आव्हाडांविरोधात आंदोलन सुरु आहे.”शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोकांचा समावेश ” हा मेन मुद्दा बाजूला ठेवत भाजपा , शिवसेना महाराष्ट्र सरकार तेल टाकण्याचे काम करत आहे .