रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षपदी संभाजी चिकटे यांची नियुक्ती

Spread the love

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहर जिल्हा अतिशय वेगाने विकसित झाले आणि या शहर मध्ये शासकीय योजना , यू एल सी घोटाळा , इतर सामाजिक विकासाचा निधी ,आणि रस्ते , गटार,हे घोटाळे या सर्व पार्श्वभूमीवर पूर्व जिल्हा अध्यक्ष जलालुदिन मंसुरी यांनी आजपर्यंत आवाज उठवला नाही म्हणुन राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे,आणि प्रदेश अध्यक्षा सुनीता ताई चव्हाण ,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व प्रदेश सचिव रमेश भोईर यांच्या निरीक्षणाने जलालुदिन मंसुरी यांना पदमुक्त करून नवीन भाईंदर शहर जिल्हा अध्यक्ष पदी संभाजी चिकटे यांची नियुक्ती करण्यात येत आहे ,संभाजी चिकटे मागील 20 वर्षापासून निळ्या ध्वजाखाली समाजसेवा व राजकीय पक्षांच्या पदावर्ती काम केले . त्यांची ख्याती ही एक लढवया कार्यकर्ता म्हणून आहे त्यामुळे त्यांच्या खांद्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्ष पदी संभाजी चिकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या वेळी मिरा भाईंदर शहर मधील असंख्य कार्यकर्ते लक्ष्मी बंगला , चेंबूर येथे उपस्थित होते . मीरा भाईंदर च्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उस्ताह वाढला आहे की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असणारा माणूस शहराला भेटला असे मिरा भाईंदर शहर मधील आंबेडकरी विचारांच्या जनतेचे मत आहे ,
मिरा भाईंदर महानगर पालिका अधिकारी वर्ग यांच्या वर दरारा ठेवणार असे आंबेडकरी जनतेचे मत आहे , सर्व विकासक, ठेकेदार , यांचे काळे धंदे बाहेर काढणार , आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग , परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचे कंत्राटी ठेकेदार पदती रद्द करून कर्मचाऱ्यांच्या कायम करण्यासाठी महानगर पालिकेकडे प्रस्ताव देणार असे मत मांडले .गरीब लोकांच्या जमिनी बिल्डर लॉबी ने कायद्याविरुध हस्तगत केल्या असतील तर त्या जमिनी त्यांना महसूल विभागाकडून हस्तगत करून त्यांना सुपूर्द करणार महसूल विभाग , तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी , यांनी गरीब जनतेचे जमिनी एखाद्या बिल्डरच्या घशात घातल्या असतील तर त्या परत कायद्याने सविधान मार्गाने त्यांना सुपूर्द करणार असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) नवनियुक्त मिरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्ष संभाजी चिकटे यांनी आपल मत व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *