वंचित मिशन न्युज : अकोला प्रतिनिधी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर ) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनानुसार अकोला जिल्हा मुर्तिजापुर मधुन श्री सचिन कोकणे ,मेहकर, मधुन श्री संतोष इंगले, दर्यापुर मधुन श्री कैलाश मोरे,ची उम्मीदवारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील यांनी जाहीर केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 07 अक्टूबर 2024 रोजी मुर्तिजापुर येथील होटल व्यास मध्ये अकोला जिला प्रभारी श्री सचिन कोकणे यांनी प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित केली होती त्या प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये पक्षाचे राष्ट्रिय सरचिटणीस यांनी उमेदवाराची यादी जाहीर केली.आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डा मोहनलाल पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत बनविण्या करिता प्रयास करित आहे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर )राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यंच्या नेतृत्वात पक्ष सध्या देशाच्या 30 राज्यात कार्यरत आहे असे स्पट केले यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब पवार, प्रदेश सचिव श्री कैलाश मोरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष श्री संतोष इंगले, श्री रामदास घोंसले, श्री आनंदराव कोकणे, सिमाताई सरदार, सोनुताई मनोहरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी मिलिंद मोरे, संतोष कोकणे, माजी सरपंच पंजाबराव मांडोकर, अताहर खान, धनराज सपकाळ, शंकरराव औझाडे, गौरव वानखेड़े, बंडु कोकणे, अंकूश जाधव, दिपक चेकरे, रवि गोपनारायण, राजु वाकपांजर, आदि उपस्थित होते।