बदलापूर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांकडून गुन्हेगाराला अभय असल्यामुळे सराईक गुन्हेगार वाढले , .. उध्दव बाळासाहेब ठाकरे ( शिवसेना U B T )……..
बदलापूर चिमुकलीवर लैंगिक अत्त्याचार प्रकरणी पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबव्या, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचं सरकार (महाविकास आघाडी) ‘शक्ती’ कायदा आणणार होतं. त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र तेव्हा करोनाचा काळ होता. त्यामुळे आपल्याला केवळ २ ते ३दिवस अधिवेशन घेता येत होतं. अधिवेशनात आपल्याला शक्ती विधेयक मांडता आलं नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही शक्ती कायदा पारित करणार होतो. मात्र काही लोकांनी गद्दारी करून आमचं सरकार पाडलं. आता या गद्दारांनी सरकार स्थापन केलं आहे. मात्र, शक्ती विधेयक प्रलंबित ठेवलं आहे.बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर (एका मुलीचं वय चार वर्षे, तर दुसऱ्या मुलीचं वय सहा वर्षे) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. नागरिकांनी बदलापूर बंदची हाक देत रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. तसेच ज्या शाळेत ही घटना घडली आहे त्या शाळेत तोडफोड केली. दरम्यान, हे आंदोलन चिघळलं असून पोलीस व आंदोलक आमनेसामने आले आहेत. बदलापूर स्थानकात दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तर शाळेची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबव्या, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचं सरकार (महाविकास आघाडी) ‘शक्ती’ कायदा आणणार होतं. त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र तेव्हा करोनाचा काळ होता. त्यामुळे आपल्याला केवळ दोन ते तीन दिवस अधिवेशन घेता येत होतं. अधिवेशनात आपल्याला शक्ती विधेयक मांडता आलं नाही.
बदलापूरमधील आंदोलनावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे म्हणाले, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. तत्पूर्वी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. प्रशासनाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात दिरंगाई करू नये. तरच त्या दोन चिमुकलीला न्याय मिळेल