दिनांक 16/05/2024 रोजी एक रेल्वे पोलीस कर्मचारी(वसई) हा चावी बनवण्यासाठी इसम नामे मोहम्मद अली अन्सारी राहणार माणिकपूर वसई याच्याकडे चावी बनवण्यासाठी गेला होता, रेल्वे पोलीस कर्मचारी यास 2 चाव्या बनवायच्या होत्या म्हणून त्याने अन्सारी यास सांगितले त्यावर अन्सारी याने प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे 80 रुपये सांगितले. त्यावर रेल्वे पोलीस कर्मचारी याने होकार दिला अन्सारी याने 2 चावी बनवल्या नंतर रेल्वे पोलीस कर्मचारी याने 60 रुपये फोन पे केले. त्यावर अन्सारी याने उर्वरित 20 रुपये देण्यास सांगितले, परंतु याचा वसई रेल्वे पोलिस कर्मचारी यास राग आल्याने त्याने त्यास तो पोलीस असल्याचे सांगून पोलीस स्टेशन ला घेऊन जाण्याची धमकी देत शिवीगाळ केली त्यांचा वाद झाल्याने ते दोघेही माणिकपूर पोलिस ठाण्यात गेले तेथे पोलीस ठाणे अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागप्पा सलगरे हे कर्तव्यावर होते , वसई रेल्वे पोलिसाने सलगरे यांना अन्सारी बाबत सांगितले, त्यावर PSI सलगरे यांनी कोणतीच शहानिशा न करता अन्सारी यास उद्देशुन ” इसको तो 50 रुपये भी नही देना चाहीये, जो मिला वो भी ज्यादा है ” असे बोलून शिवीगाळ केली त्यावर अन्सारी याने रेल्वे पोलिसांना द्यावयाच्या 2 चाव्या ठाणे अंमलदार यांच्या टेबलवर ठेऊन निघून जात होता याचा राग मनात धरून , चिडून पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागप्पा सलगरे यांनी ठाणे अंमलदार कक्षात अन्सारी यास तोंडावर ठोस्याबुक्यांनी मारहाण केली , त्यात अन्सारी याच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले.
अन्सारी यास अमानुष मारहाण केल्याची बातमी लोकमत पेपर ला लागली त्याची दखल सुमोटो राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. मानवी हक्क आयोगाने 26 जून रोजी सरकारला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे… यामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सुशांत मधुकर पवार यांनी आंदोलन उभे केल्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागप्पा सलगरे यांच्या विरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/2024 भादवी कलम 325, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पोलीस अधिकारी हे अद्यापही याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्यामुळे याचा तपास निःपक्षपाती होईल याची शाश्वती वाटत नाही.. वरिष्ठ पोलीस अधिकारी अजूनही PSI सलगरे यांना पाठीशी घालत आहेत… त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करून या गुन्ह्याचा तपास इतर पोलीस ठाण्यास वर्ग करण्यात यावा.. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष श्री सुशांत मधुकर पवार यांनी केली आहे.