वंचित मिशन न्युज – रत्नागिरी (प्रतिनिधी : साहिल प्रकाश कांबळे) ” नको समिती नको चौकशी नराधमांना द्या फाशी ” बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध असा बँनर घेवून शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीकडून रत्नागिरी जिल्हा देवरूख येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बदलापूर येथील घटनेचा आज शुक्रवारी निषेध करण्यात आला व उद्या शनिवारी देवरुख बंदची हाक देण्यात आली तसेच शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे तहसिलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, शिवसेना तालुकाप्रमुख बंडयाशेठ बोरुकर, काँग्रेसचे नेते अशोकराव जाधव, माजी उपसभापती अजित गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भुवड, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, मोहन वनकर, संतोष लाड, युयुत्सू आर्तें, अनिल भुवड, निलम हेगशेट्ये, शीतल करंबेळे, सबुरी थरवळ, मुन्ना थरवळ, युवासेना तालुकाप्रमुख केतन दूधाने, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस भाटकर, संदीप धावडे, सचिन शिंदे, अमर गवाणकर, बाबा सांवत, सिध्देश सुर्वे, रेहान गडकरी, विनित बेर्डे, शाखाप्रमुख विनोद माने, संजय माईन, बाबु गोपाळ, दिपक भेरे, उदय बेर्डे, राजन शेट्ये, दर्शन भाटकर, दर्शन कांबळे, निखिल जाधव, विकास जागुष्टे, ओम सुर्वे, संदेश जाधव, संतोष शिंदे आदींसह शिवसेना व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.