रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश…
वंचित मिशन न्युज – रत्नागिरी (प्रतिनिधी : साहिल प्रकाश कांबळे) वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी दक्षिण विभागाची सभा आज दिनांक २३/९/२०२४ रोजी सावंत यांच्या निवासस्थानी पाच तालुक्यांच्या अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष आदरणीय गौतम गमरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेला राजापूर अर्बन को. ऑप. बँक संचालक व उद्योजक,कुणबी समाजाचे कार्यकर्ते माननीय प्रकाश कातकर साहेब, मनसेचे राजापूर तालुक्यात गेली दहा वर्षे काम केल्यानंतर पक्षाची सध्यस्थितीत ध्येय धोरणे पटत नसलेले तरुण तडफदार नेतृत्व माननीय अमृत तांबडे साहेब यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष गौतम गमरे साहेब यांनी केले. हा पक्ष प्रवेश मारुती रामचंद्र जोशी काका, यांच्या प्रयत्नातून झाला.
या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीत उत्साह निर्माण झाला असून नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या संघटना बांधणीला यश येत आहे. त्यामुळे यापुढे अनेकांचे पक्षप्रवेश करण्यात येणार आहेत.जिल्हाध्यक्ष यांनी दि. १९/९/२०२४ रोजी खंडाळा येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील आदेशाची माहिती दिली. पाच तालुक्यातील पक्षसंघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. अशा प्रकारे आज कार्यक्रम संपन्न संपन्न झाला.