वंचित मिशन न्यूज जिल्हा रायगड:- ऐतिहासिक रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील निसर्गरम्य केलटे गावाला “स्वप्नातील गाव” म्हणून “स्वदेश फाऊंडेशन” संस्थेच्या वतीने प्रमाणित करण्यात आले.
महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण पंचशीलाने आरंभ झालेल्या शानदार सोहळ्याचे उद्घाटन स्वदेश फाऊं डेशनचे महाव्यवस्थापक श्री. शिवतेज ढाबुल, केलटे ग्रामपंचायतचे उपसरपंच आयु. श्रीधर तांबे आणि पोलीस पाटील श्री. किसन पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष केलडे बौद्धजन विकास मंडळाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष बौध्दाचार्य आयु. रविंद्र तांबे आणि संघमित्रा महीला मंडळाच्या अध्यक्षा आयुनी. रेश्मा राजाराम जाधव यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशद्वारावर मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. ङ्गङ्गम्हसळा तालुक्यातील मौजे केलटे आदर्शवान गाव असून स्वप्नातील गाव पुरस्कार म्हणजेच पूर्वजांच्या अथक परिश्रमाचे तद्वतच संस्कारांचे एकूण फळीत आहे असे पत्रकार आणि मुंबई शाखेचे सचिव आयु. विनायक जाधव यांनी प्रस्तावना सादर करताना मनोगत व्यक्त केले.
केलटे गावातील ७० विकास कामे पूर्ण झाली असून गावातील स्थलांतरित लोंढे रोखण्यासाठी आधुनिक शेती, फळ-फुल बागा, कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय यांसारखे उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे उपस्थित अधिका-यांच्या निदर्शनास आणले. स्वप्न उघड्या लोकांनी पाहुन सत्यात उतरविण्यासाठी कृतीशील राहणे अगत्याचे आहे असे मनोगत बौध्दाचार्य आयु. रविंद्र तांबे यांनी व्यक्त केले. ङ्गङ्गस्वदेश फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक श्री. शिवतेज ढावुल यांनी स्वच्छता, सहकार्य, समृद्धी, स्वावलंबन यांचे महत्त्व विशद करताना तमाम केलटे ग्रामस्थांच्या एकतेचे, एकजुटीचे कौतुक करून विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ङ्गङ्गयाप्रसंगी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित ग्रामस्थांना आंब्याच्या रोपवाटिका प्रदान करून अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. केलटे बौद्धवाडी आणि परिसरातील रंगरंगोटी आणि रांगोळ्या प्रमुख आकर्षण ठरले. यासाठी केलडे बौद्धजन विकास मंडळ आणि संघमित्रा महीला मंडळ सुमारे आठवडाभर राबत होते.
सकाळी ११.३० वाजता सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची सांगता दुपारी २.३० वाजता सहभोजन करून झाली. ङ्गङ्गकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. अनंत जाधव, सुभाष जाधव, प्रमोद जाधव, समीर जाधव, रुपेश श्री. जाधव, मंदार जाधव, चंद्रकांत तांबे, धर्मेंद्र जाधव, लक्ष्मण जाधव, प्रतीक जाधव, धर्मेंद्र गायकवाड, राजाराम जाधव, नितीन जाधव, बाळ तांबे, अतिशय मेढेकर, स्वदेशचे सह व्यवस्थापक श्री. सानप, महीला अध्यक्षा सौ. रेश्मा जाधव,माजी सरपंच श्रीमती. छाया दामोदर जाधव, सौ प्रभा जाधव, सौ. नितिशा जाधव, शुभांगी जाधव आणि समस्त महीला वर्गानी विशेष परीश्रम घेतले.