लातूर शहर वाहतूक शाखेने अवजड वाहनांना ठोठावला2कोटी 37 लाखाचा दंड
लातूर शहरांमध्ये अनेक वर्षापासून ओव्हरलोड वाहन भरून जात होती त्या वाहनावर निर्बंध आणण्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करत दोन कोटी सदतीस लाखाचा दंड आकारण्यात आला यामुळे ओव्हर लोड वाहतूक अपघात नियंत्रण येईल आणि शासनाचा महसुलात ही वाढ होईल. ओव्हरलोड वाहतूक करणे हे मोटर वाहन कायद्यात गुन्हा आहे तरी अशी वाहनावर थेट कारवाईचा इशारा आशुतोष बारकुल (A, ,R,T,O ,Latur) यांनी दिला आहे प्रादेशिक परिवहन विभाग लातूर यांनी वाहन तपासणीसाठी दोन पथके सज्ज केले आहेत या पथकामार्फत वर्षभर कारवाई करण्यात येईल असे सांगितले हे पथक बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड, नांदेड नका, तुळजापूर रोड,या मार्गावर पथकाचे विशेष लक्ष असते . हेल्मेट , सीट बेल्ट , न वापरणाऱ्या चालकास ही दंडात्मक कारवाई करून एकूण २लाख ५७हजाराचा दंड वसूल करण्यात आला .