वंचित मिशन न्युज – १ सप्टेंबर, रत्नागिरी (प्रतिनिधी) रत्नागिरी जि. प. चे माजी शिक्षण सभापती व कुण रडबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांची प्रमुख उपस्थिती देवरूख- संगमेश्वर तालुका कुणबी समाज युवक मित्र मंडळ यांच्यावतीने कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कुणबी युवक बांधवांची बैठक देवरूख येथे आज शनिवारी पार पडली.
संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाजाला वारंवार विकासापासून वंचित ठेवले जात असून राजकीय क्षेत्रातही अवहेलना केली जात आहे. यासाठी राजकीय आणि समाजकारणात मुरलेले आणि सदैव कुणबी समाजाच्या पाठीशी असणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून सहदेव बेटकर यांचे नाव अग्रेसर आहे. ते संगमेश्वर -चिपळूण विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहावेत यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समज बांधव त्यांच्या पाठीशी असून त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून संगमेश्वर तालुक्याचे समाज बांधव आग्रही आहेत. यावेळी समाजाचे प्रश्न आमच्या अडचणी, आम्हास विचारात न घेतल्याने संगमेश्वर तालुक्यातील कुणबी युवा समाज बांधव इर्षेने पेटून उठले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाजाला वारंवार विकासापासून वंचित ठेवले जात असून राजकीय क्षेत्रातही अवहेलना केली गेली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील समाजबांधव सहदेव बेटकर यांच्या पाठीशी असल्याचा या झालेल्या बैठकीमध्ये एकमुखी निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कुणबी समाजाचा बुलंद आवाज सहदेवजी बेटकर, शेखर जोगळे, दिपक भेरे, संदिप धावडे, सुनिल करंडे, बेलारी सरपंच संदेश घाग, संदिप वेलवणकर, अनिल पाताडे, विष्णू टक्के, सुरेश घडशी, निवेखुर्द सरपंच राजाराम पर्शराम, कुंडी सरपंच दिलीप लोकम, पप्पू नाखरेकर, यशवंत चांदे, दिलीप पेंढारी, कृष्णा हरेकर, धोंडू करंबेळे, राजाराम सनगरे गुरुजी, चेतन परबते, विवेक कुळये, रघुनाथ गिडये, नंदू भुवड, भरत गावडे, स्वप्निल लोकम, केशव गावडे, निलेश घवाळी, गोविंद रांबाडे, देवजी वेले आदींसह इतर कुणबी युवा समाज बांधव तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.