गेल्यात तीन दिवसांपासून जंबो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच ठाणे स्थानकात सुरू असलेली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि प्लॅटफॉर्म रुंदीकरणाची काम पूर्ण झाली असून अप आणि डाउन लाईनवरील धीम्या आणि जलद लोकलची वाहतूक सुरू झाली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर (Central Mega Block) जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल ९९ तास, ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तास आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.