देवरूख पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला…
वंचित मिशन न्युज – रत्नागिरी (प्रतिनिधी : साहिल प्रकाश कांबळे) देवरूख पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्याचा पदभार आहे त्यांची ओळख अतुल जाधव डँशिंग पोलीस अधिकारी अशी आहे
देवरूख पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी वेंगुर्ला येथे कार्यरत असलेले अतुल माधवराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. अतुल जाधव यांची डँशिंग पोलीस अधिकारी अशी ओळख आहे.अनेक नागरिकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
देवरूख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून संजय पाटील कार्यरत होते. त्यांनी देवरूख पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणून अत्यंत चांगली सेवा बजावली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून त्यांनी अधिकारी म्हणून काम केले आहे. कर्मचारीप्रिय अशी त्यांची ओळख आहे. देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. आता रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षकपदी मुळचे सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील अतुल जाधव यांची नियुक्ती झाली आहे. अतुल जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली देवरूख पोलिस ठाणे येथे झाली असून देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. अतुल जाधव यांनी यापुर्वी नवीमुंबई व सिंधुदुर्ग येथे १२ वर्ष पोलीस अधिकारी म्हणून उत्तमरित्या सेवा बजावली आहे. आता त्यांची देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर आपला भर असून गणेशोत्सवाच्या काळात देवरूख शहरात ठिकठिकाणी पोलीसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. याशिवाय शहरात वाहतुक कोंडी होवू नये याची पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात आली असून यासाठी दोन ट्रँफीक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीलाही पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.