मिरा भाईंदर शहरात योग्य आरोग्य सेवा न मिळाल्याने रुग्ण व नवजात बालक बेहाल
मीरा भाईंदर विभागात महाराष्ट्र शासनाचे पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयाचा गावंढळ कारोबार , सोनोग्राफी व फोटो थेराफी मशीनरी अभावी गरीब रुग्णांचे तारीख वर तारीख देवून केले बेहाल.
मीरा भाईंदर विभागात महाराष्ट्र शासनाचे पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय चालू झाल्यापासून आत्तापर्यंत एक सोनोग्राफी मशीन असून 15 लाख ते 20 लाख लोसंखेच शहरामध्ये मध्यम वर्गातील लोकांची जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांना व महिलांना बालसंगोपन आणि प्रसूती साठी आवश्यक असलेल्या सोनोग्राफी मशीन, आणि फोटो थेरफी मशीन ची गरज आहे .महिलांना सोनोग्राफी साठी एक महिना पुढची तारीख रुग्णालयातील कर्मचारी देत आहेत .तरी आणखीन नवीन मशीन मागवून घ्यावी या करिता मिलिया फाउंडेशन तर्फे मागणीचे निवेदन डॉ जाफर तडवी यांना देण्यात आले . यावेळी डॉ तडवी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मागणीची पुरतात करू असे आश्वासन दिले