जातीय वादी महायुती सरकार आणि शिंदे सरकार च्या अनधिकृत मुरूम भराव प्रकरणी आवाज उठवल्यामुळे वर्धा येथे नितेश कराळे मास्तर यांच्यावर झालेल्या भ्याड झाल्याबाबत जाहीर नेषध आंदोलन

Spread the love

वंचित मिशन न्युज – ९ सप्टेंबर, वर्धा (प्रतिनिधी) राज्य सरकार व स्थानिक आमदार यांनाअनधिकृत मुरूम भराव प्रकरणी विचारण्यासाठी नितेश कराळे मास्तर यांनी मुरुमाची रॉयल्टी पावती दाखवा असे प्रश्न करणे व पावती मागणे हा गुन्हा आहे का ? पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या खास सभेसाठी चोरीचा मुरुम वापरणे हे लज्जास्पद नव्हे का ?

असा प्रश्न आहे की,ज्या मुरुम माफियांच्या,मुरमाच्या चोऱ्या स्थानिक व जिल्हा महसुल विभागाचे अधिकारी तसेच जनतेने निवडूण दिलेले स्थानिक लोकप्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने पकडू शकले नाहीत,ते मा.कराळे मास्तरांनी जनते समोर करुन दाखविले,मुरुम माफियांकडून मुरमाच्या चोऱ्या कशा होतात ते पण त्यांनी राज्य सरकारला दाखऊन दिले,त्याच मान्यवर कराळे मास्तरांवर हेच ” मुरुम माफिया चोर ” प्राणघातक हल्ला करतात . म्हणूनच कराळे मास्तर यांनी केलेल्या आरोपा नुसार अशा मुरुम माफिया चोरट्यांना पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या सभेच्या स्थळाच्या सौंदर्यासाठी आशिर्वाद नेमका कुणाचा ? भाजपचे स्थानिक आमदार यांनी खुलासा करावा !

मोदींच्या सभेसाठी महसूल अधिनियम परवानगी शिवाय चोरीच्या मार्गाने मुरुम नेणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत…. ? ते जनते समोर ताबडतोब उघड करावे आणि उच्चस्तरीय कार्यवाहीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी ! अन्यथा तीव्र आंदोलन करु इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( अं) राष्ट्रिय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आला

नितेश कराळे मास्तर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) तर्फे जाहीर निषेध करण्यासाठी मा . जिल्हाधिकारी वर्धा यांना आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र मुनेश्वर,वर्धा
अध्यक्ष : विदर्भ प्रदेश – रिपाइं (अं) यांनी निवेदनामध्ये देण्यात आला यावेळी पार्टी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *