काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व तरूण कार्यकर्ते अमोल लाड यांनी स्वखर्चाने जनतेच्या सेवेसाठी दिली रूग्णवाहिका
वंचित मिशन न्युज – संगमेश्वर (प्रतिनिधी : साहिल प्रकाश कांबळे) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नवीमुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड व तरूण कार्यकर्ते अमोल लाड यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जनतेच्या सेवेसाठी लोकार्पण केली. याबद्दल त्यांना तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद दिले जात आहेत.
अतिशय कमी दरात ही रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी चौवीस तास उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर सर्प दंश रुग्णांसाठी इंजेक्शनचा बॉक्स प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला. याच कार्यक्रमात इंडीयन नॅशनल काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न काँग्रेसचे जेष्ठ नेते आण्णा गुरव यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी काका शेट्ये यांनी श्रीफळ वाढवले. अविनाश लाड यांनी रुग्णवाहिकेची किल्ली भिकू पाथरे यांच्याकडे सुपूर्द केली.
या सेवेचा रत्नागिरी जिल्हा व कोल्हापूर महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील रुग्णांना होणार आहे. तरी या सेवेचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अविनाश लाड यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्यामुळे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. यावेळी अविनाश लाड, अमोल लाड, आण्णा गुरव, कमालाकर पाथरे, भिकू पाथरे, आबा सावंत, शेखर कोलते, संजय गांधी, काका शेट्ये, संतोष भिंगार्डे, प्रमेश मोरे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महंमद पावसकर, सचिन भिसे आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.