रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय कार्यकर्ता पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर संपन्न ….
वंचित मिशन न्युज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय कार्यकर्ता पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 2024मध्ये होणाऱ्या विधानसभेचा आढावा आणि राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले आणि जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी , व कार्यकर्ते यांनीही अपल्या कार्याची पोच पावती या मार्गदर्शन शिबीरात प्रत्येक तालुका आणि जिल्हा पदाधिकारी यांनी आपल्या भाषणातून दिली , लोकसभेमध्ये महाविकस आघाडी सोबत युती तर होती पण आता मात्र महाविकास आघाडी कडे मात्र काही जगाची मागणी करणार , जागा नाही दिल्या तर स्वबळावर निवडणूक लढवणार असे उदगार पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी केले यावेळी मिरा भाईंदर शहर युवा अध्यक्ष प्रविण कांबळे यांनी दीपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा भाईंदर शहर मध्ये मेळावा आयोजित करणार असा शब्द पक्ष्याचे प्रवीण कांबळे यांनी दिला यावेळी मिरा भाईंदर 145 विधानसभा क्षेत्र , आणि ओवळा माजिवडा 146 विधानसभा क्षेत्र चे 2024 विधानसभेचे उमेदवार देणार अशी ग्वाही दिली . या मार्गदर्शन शिबिर ला रिपब्लीकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे,महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीता ताई चव्हाण , पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार , कैलाश जोगदंड , दादासाहेब ओव्हाळ, प्रवीण कांबळे , विनोद जोशी ,उदयभान गुप्ता ,राजेश पटेल, रईस जस्मिन, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते